मोबाइल बँकिंग सेवा
- ग्राहकांना घरबसल्या आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी संस्थेने मोबाईल बँकिंग सुरु केलं आहे.
- याद्वारे ग्राहकांना मोबाईल व डी टी एच रिचार्ज करता येतो. तसेच खात्याचा खातेउतारा देखील पाहता येतो.
- मोबाईलapp द्वारेNEFT , RTGS व फंड ट्रान्स्फर करता येते.
मेसेज बँकिंग सेवा
- ग्राहकांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना एस एम एस दिला जातो.
- परंतु त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- विनामुल्य एस एम एस सुविधा ग्राहकांना दिले जाते.
घरपोच सेवा
- खास ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी सुरु केलेली हि सुविधा.
- संस्थेतील कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी संस्थेच्या ९६७३७१५५५१ यावर संपर्क केला असता, ग्राहकांना सेवा देणेसाठी संस्थेतील कर्मचारी त्यांच्या घरी जातो व त्यांचे आवश्यक ते सर्व आर्थिक व्यवहार त्यांना घरबसल्या करून देतो.
- संस्थेचा ज्येष्ठ नागरिक व अपंग नसलेला कोणताही सभासद त्यांना देखील त्यांच्या संकटसमयी अथवा अडचणीच्या काळी घरपोच सेवा संस्था देते.